श्री तुळजाभवानी मातेस साखरेचा हार(गाठी) श्री देवीस घालण्यात येतो,मंदिराच्या मुख्य शिखरासमोर छतावर गुढी उभारण्यात येते, श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक पुजेनंतर महावस्त्र नेसीवले जातात धूप आरती नंतर भाविकांना नव वर्ष सुख समृद्धी चे जाओ यासाठी प्रार्थना करण्यात येते.
सकाळी चरणतीर्थ, अभिषेक व पुजा आरती हे विधी नेहमी प्रमाणे होतात. चैत्र महिन्यापासूनच कडक उन्हाळ्यास सुरवात होते म्हणून दुपारी 1:00 ते 4:00 पर्यंत श्री देवीस चांदीच्या पंख्याने वारा घालतात.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात येतो, या दिवशी तुळजापूर मध्ये भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात होते.
अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तसेच पितृ पूजनाचा दिवस असल्याने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात.
नृसिंह जयंती निमित्ताने मंदिरातील दैनंदिन पुजे नंतर नृसिंहसरस्वती मंदिर जवळील ओवरीत कच्ची डाळ आणि कच्या आंब्याचे पन्हे असा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात येतो.
वट पौर्णिमा या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात आणि शहरातील सुवसनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात.
श्री गजानन महाराज यांच्या पालखी मंदिरात श्री देवीच्या दर्शनासाठी येते. पालखी शहरात मुक्कामी असते.
या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात, गुरुपौर्णिमा निमित्ताने दुपारी 12:00 वाजता अरण्य बुवा मठात गुरू पौर्णिमा उत्सव साजरा करतात. श्री देवीच्या पूजेनंतर महंत आदीचा यथोचित सत्कार करण्यात येतो.
श्री देवीचे चरण तीर्थ झाल्यानंतर भवानी शंकराचे पुजारी, होमाच्या समोर भवानीशंकराचा पितळेचा नागफना मांडून नागदेवता तयार करून ठेवतात, भाविक भक्त नागोबाला दूध लाह्या, उकडलेले कानवले असा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी उत्तरपूजा करून, कल्लोळ तीर्थ मद्ये विसर्जन केले जाते.
गौर पुजे निमित्ताने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकारघालण्यात येतात.
श्री देवीच्या दैनंदिन पुजा होतात, सायंकाळी 5:00 वाजता मठाचे महंत यांच्या बैलाचे कमान वेस भागात आगमन होते त्यांना श्री देवीच्या गाभाऱ्यात आणून त्यांना श्री देवीच्या पायाचे कुंकू लावण्यात येते.
श्री तुळजाभवानी मंदिर तर्फे गणेश विहार येथे पार्थिव गणेशाची स्थापना करण्यात येते. आणि अनंत चतुर्दशी दिवशी कल्लोळतीर्थ मध्ये विसर्जन करण्यात येते.
या दिवसापासून ते शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होईपर्यंत मंचकी निद्रा सुरू होते.
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी 12:00 वजता घटस्थापना होते ,नऊ दिवस नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पुजा दैनंदिन नवरात्र ललित पंचमी पासून करण्यात येतात. नवरात्र उत्सव काळात दैनंदिन छबिना काढण्यात येतो.
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती हि मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेऊन मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.
अश्विन ते कार्तिक महिन्यात येणारा दिपावली उत्सवही तुळजाभवानी मंदिरात साजरा करण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेस सुगंधी द्रव्यासह स्नान घातले जाते आणि दैनंदिन पुजा विधी होतात.
काळभैरव भेंडोळी उत्सव हा जर वर्षी दिवाळीच्या नरकचतुर्दशी या वेळी स्थितीनुसार असतो , हा उत्सव पाहण्यासाठी हजोरो भाविक श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये येतात.
दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने त्यादिवशी श्री देवीला फराळाचे विविध नैवेद्य दाखवतात मंदिर मध्ये कलश पुजा पाडवा वाचन कार्यक्रम साजरा केला जातो
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तुळशी विवाह करण्यात येतो.
त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने कल्लोळ तीर्थ स्वच्छ धुवून साडेसातशे कापसाच्या वाती पणत्या मद्ये ताटवा पुजन केले जाते. या पणत्या द्रोणावर ठेऊन पाण्यावर तरंगत सोडतात.
या दिवसा पासून शाकंभरी नवरात्र उत्सव प्रारंभ होतो
नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी 12:00 वजता घटस्थापना होते , नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पुजा करण्यात येतात, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात घटस्थापना होते याच नवरात्र उत्सव मद्ये गावातून जल यात्रा काढली जाते.
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी ,श्री देवीच्या मंदिर मध्ये पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो.
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये ग्रहण काळात श्री देवीस सोवळ्यात आणि पांढर्याशुभ्र वस्त्रा मध्ये ठेवण्यात येते आणि साज शृंगार नसतो आणि ग्रहण कालवधी संपल्यावर श्री देवीस स्नान घातले जाते आणि पूजा करण्यात येते.
श्री तुळजाभवानी निद्रा ह्या तीन प्रकारच्या आहेत. श्री तुळजाभवानी मातेची मुळ मूर्ती हि सिहासनावरून उचलून श्री देवीच्या पलंगावर निद्रा साठी असते. श्री देवीचे असे रूपाचे दर्शन घेण्यासाठी हजोरो भाविक – भक्त दर्शनास येतात.
छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मुर्ती एका चांदीच्या मेघडंबरी मध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवुन मंदिरा भोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करतात याला छबिना म्हणतात.
श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार , पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्या नंतर एक दिवस अश्या प्रमाणे करण्यात येतो .अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो .फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो.. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील २१ दिवस निद्राकाळातील छबिना काढला जात नाही.हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजरो भाविक येतात.
महत्व :- श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवा मध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजुतील सर्व गावांच्या शिवा येता या शिवांवर ( हद्द ) उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते . येते उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो .या छबीना याचे महत्व अधिक आहे तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये छबीन्या समोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात . या छबिन्या मध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्या वेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातवरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो.