नवरात्र काळात तुळजापूरला येणाऱ्या लाखो भाविकांना उत्सवाची संपूर्ण आणि अचूक माहिती देणे हा मुख्य उद्देश आहे.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरन्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते।।
।। जय भवानी ।।
श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवात आपले मनःपूर्वक स्वागत!
श्री क्षेत्र तुळजापूर येथील शारदीय नवरात्र उत्सव हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातील भक्तांसाठी एक अनमोल सोहळा असतो. आई भवानीच्या या उत्सव काळात येणाऱ्या भाविक भक्त आणि तुम्हाला सर्व माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी श्री तुळजाभवानी देविजीचे वंशपरंपरागत अधिकृत पुजारी श्री नागेश साळुंके यांच्या वतीने हे पेज तयार करण्यात आले आहे.
पेजचा उद्देश: तुळजापूर मध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना यात्रा काळात उपलब्ध असलेल्या तुळजापूर मधील सोयी-सुविधांची माहिती देऊन त्यांचा प्रवास सुकर करणे — हि एक प्रकारे भाविकांची सेवा केल्यासारखे आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत आहे. आई भवानीच्या चरणी लीन होण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा प्रवास आरामदायी आणि सुलभ व्हावा, यासाठी आम्ही विविध सेवा आणि सुविधा बाबतची माहिती उपलब्ध करून दिल्या आहेत.
तुमचा तुळजापूर मधील यात्रा दर्शन, कुलधर्म कुलाचार, पूजा सेवा, आपल्या रूढी-परंपरा, प्रवास इत्यादी सर्व सुखकर व्हावा हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना! श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी यांच्या मार्फत भाविक भक्त यांना माहितीसाठी एक सेवा प्रयत्न...