Loading Seva
श्री तुळजाभवानी देवीच्या कुलधर्म व कुलाचार पूजा सेवा विधिवत करण्यासाठी आपल्या इच्छेनुसार निवडा.

।। श्री तुळजाभवानी माता 'पंचामृत अभिषेक, साडी-चोळी ओटी, प्रति सौभाग्य अलंकार व नैवेद्य' महापूजा ।। श्री तुळजाभवानी देवीला साडी-चोळी ओटी, सौभाग्य अलंकार आणि पंचामृत अभिषेक अर्पण करणे हे अत्यंत पुण्यकारक व भाग्याचे मानले जाते. ज्या भाविकांना तुळजापूरच्या पावन शक्तिपीठावर प्रत्यक्ष उपस्थित राहून ही सेवा करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आम्ही ही विशेष पूजा सेवा उपलब्ध करून दिली आहे. साळुंके पुजारी यांच्या माध्यमातून तुमच्या नावे हा संपूर्ण परंपरेनुसार विधी संपन्न केला जातो.

"आई तुळजाभवानीची ओटी भरणे म्हणजे केवळ विधी नाही, तर ते भक्त आणि भगवती यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक आहे." आपल्या कुलदेवतेचा सन्मान करण्यासाठी आणि तिची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी साळुंके पुजारी यांच्या माध्यमातून श्रद्धेने हा मंगल विधी संपन्न करा.

श्री तुळजाभवानी 'अभिषेक पूजा' आणि ९ वार साडी अर्पण सेवा || साळुंके पुजाऱ्यांद्वारे केली जाणारी ही 'अभिषेक पूजा व ९ वार साडी अर्पण सेवा' म्हणजे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा पंचामृताने (दूध, दही, मध, साखर आणि पूजा साहित्य) केला जाणारा विधीवत अभिषेक आणि पारंपरिक ९ वार साडी अर्पण करण्याचा पवित्र विधी होय. यानंतर पारंपरिक पूजा आणि भक्ताच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली जाते.

।। श्री तुळजाभवानी माता विशेष सेवा: 'पंचामृत अभिषेक, नऊवारी साडी-चोळी व विधीवत ओटी' महापूजा ।। 'नऊवारी साडी-ओटी' आणि पवित्र 'पंचामृत अभिषेक' श्री तुळजाभवानी देवीला अर्पण करणे हे अत्यंत भाग्याचे व पुण्याईचे मानले जाते. ज्या भाविकांना तुळजापूरच्या पावन शक्तिपीठावर प्रत्यक्ष उपस्थित राहून ही सेवा करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आम्ही ही विशेष पूजा सेवा उपलब्ध करून दिली आहे. साळुंके पुजारी यांच्या माध्यमातून तुमच्या नावे हा संपूर्ण शास्त्रोक्त विधी संपन्न केला जातो.

।। श्री तुळजाभवानी माता कन्या पूजन व भोजन सेवा - बालशक्तीचा सन्मान आणि कृपाशीर्वाद ।। देवी भागवत आणि दुर्गासप्तशतीमध्ये कुमारिका पूजनाला 'यज्ञ' इतके महत्त्व दिले आहे. कन्या ही निसर्गातील पवित्रता आणि नवचैतन्याचे प्रतीक आहे. तुळजापूरच्या पावन क्षेत्रात लहान कन्यांना (कुमारिकांना) आदरपूर्वक बोलावून, त्यांचे पाय धुवून, त्यांना साक्षात देवी मानून भोजनाचा नैवेद्य अर्पण केला जातो. ही सेवा केवळ भूक शमवण्यासाठी नसून, ती साक्षात बाल-भवानीची तृप्ती आहे. विशेषतः नवरात्रीचे उपवास किंवा घरातील शुभ कार्याच्या पूर्णत्वासाठी कन्या पूजन करण्यात येते अशी आख्यायिका आहे. "कन्यां कांचनवर्णाभां दिव्यरलैरलंकृताम् । पूजयामि जगन्मातः प्रीता भव सदा मम ।। "

।। श्री तुळजाभवानी माता अखंड नंदादीप सेवा - नऊ रात्रींचा चैतन्यमय प्रकाश विधी ।। नवरात्र काळात आई तुळजाभवानीच्या चरणी 'अखंड नंदादीप' प्रज्वलित करणे ही अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक महान उपासना आहे. ज्या भक्तांना घरी नंदादीप लावणे शक्य नाही, त्यांच्यासाठी तुळजापूरच्या पावन शक्तिपीठावर अखंड ज्योतीसाठी तेल सेवा केली जाते. तसेच अनेक भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या शक्तिपीठामध्ये नवरात्र पर्वकाळात रूढी-परंपरेनुसार अखंड नंदादीप तेल सेवा अर्पण करतात.

।। श्री तुळजाभवानी माता विशेष सेवा: देवीच्या निद्रा काळातील 'सुगंधी तेल अभिषेक' सेवा ।। या विशेष धार्मिक व सात्त्विक सेवेमध्ये श्री तुळजापूर क्षेत्रामध्ये श्री तुळजाभवानी मातेच्या निद्रा काळात (शयन काळ) देवीच्या चरणी व मूर्तीस पवित्र व सुगंधी द्रव्यांचे तेल अर्पण करून 'सुगंधी तेल अभिषेक' करणे, शास्त्रोक्त आरती आणि कुटुंबाच्या आरोग्य व शांतीसाठी विशेष प्रार्थना या सर्व मुख्य सेवांचा समावेश आहे.

।। श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा - आदिमायेच्या विजयाचा आणि शक्तीचा जयघोष ।। 'श्री दुर्गा सप्तशती' हा शक्ती उपासनेतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आई तुळजाभवानीच्या पावन शक्तिपीठावर तुमच्या नावे होणारा हा पाठ म्हणजे संकटांचा नाश करणारी आणि जीवनात चैतन्य निर्माण करणारी एक दिव्य आध्यात्मिक प्रक्रिया आहे. साळुंके पुजारी यांच्या माध्यमातून हा शास्त्रोक्त विधी संपन्न करा.

|| श्री तुळजाभवानी 'अभिषेक पूजा' || साळुंखे पुजाऱ्यांमार्फत केली जाणारी ही 'अभिषेक पूजा सेवा' म्हणजे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा पंचामृताने (दूध, दही, मध, साखर आणि इतर पवित्र अर्पण यांचे मिश्रण) केला जाणारा विधीवत अभिषेक होय. त्यानंतर पारंपरिक पूजा आणि भक्तांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली जाते.

।। श्री तुळजाभवानी दुर्गाष्टमी विशेष सेवा: 'पंचामृत अभिषेक व नैवेद्य' पूजा ।।हिंदू संस्कृतीनुसार दरमहा येणारी दुर्गाष्टमी ही शक्ती उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. ज्या भाविकांना तुळजापूरच्या पावन शक्तिपीठावर प्रत्यक्ष उपस्थित राहून पूजा करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आम्ही 'दुर्गाष्टमी पंचामृत अभिषेक व नैवेद्य' सेवा सुरू केली आहे. साळुंके पुजारी यांच्या माध्यमातून ठरलेल्या दुर्गाष्टमी रोजी तुमच्या नावे हा शास्त्रोक्त विधी संपन्न केला जातो.

।। श्री तुळजाभवानी नवरात्र महापर्व: मर्यादित 'नवरात्र पूजा' सेवा ।। नवरात्रीच्या नऊ रात्री म्हणजे भक्तीचा अथांग महासागर! वंशपरंपरेनुसार आमच्याकडे येणाऱ्या ज्या भाविकांना वेळेअभावी किंवा अंतरामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्या मागणीनुसार आम्ही 'एकत्रित नवरात्र पूजा' सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये दुग्ध अभिषेक, पुरणपोळी नैवेद्य, साडी-खण ओटी आणि कुंकुमार्चन या सेवा तुमच्या नावे शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न केल्या जातात.

या विशेष कुंकुमार्चन सेवेमध्ये श्री तुळजापूर क्षेत्रामध्ये श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी / श्रीयंत्रावर मंत्रोच्चारासह श्री देवीच्या पवित्र कुंकू अर्पण करून 'कुंकुमार्चन' करणे, शास्त्रोक्त आरती, सौभाग्य कामना आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना या सर्व मुख्य सेवांचा समावेश आहे.

।। श्री तुळजाभवानी माता कुलधर्म-कुलाचार: पारंपारिक जागरण गोंधळ सेवा ।। 'जागरण' म्हणजे देवीची केलेली स्तुती आणि 'गोंधळ' म्हणजे आदिमायेच्या चरणी अर्पण केलेली संगीतमय सेवा. श्री तुळजापूर क्षेत्री या विधीला अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व आहे. जेव्हा घरामध्ये विवाह, वास्तुशांती, मुंज किंवा अपत्य प्राप्ती यांसारखी मंगल कार्ये होतात, तेव्हा कुलदेवतेची कृपा कायम राहावी यासाठी गोंधळ घातला जातो. साळुंके पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली, अनुभवी गोंधळी बांधवांकडून हा विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडला जातो, "यन्मंगलाय सततं परिपूर्णमस्तु ।"

।। श्री तुळजाभवानी माता विशेष सेवा: 'नऊवारी साडी-चोळी व विधीवत ओटी' अर्पण पूजा ।। श्री तुळजाभवानी देवीला अर्पण करणे हे अत्यंत भाग्याचे व पुण्याईचे मानले जाते. ज्या भाविकांना तुळजापूरच्या पावन शक्तिपीठावर प्रत्यक्ष उपस्थित राहून ही सेवा करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आम्ही ही विशेष पूजा सेवा उपलब्ध करून दिली आहे. साळुंके पुजारी यांच्या माध्यमातून तुमच्या नावे हा पारंपरिक विधी संपन्न केला जातो.

|| श्री तुळजाभवानी मातेस 'पुरणपोळी नैवेद्य पूजा' अर्पण सेवा || या विशेष धार्मिक आणि सात्विक सेवेमध्ये तुळजापूर येथील देवी श्री तुळजाभवानी यांना शुद्ध सात्विक पारंपरिक 'पुरणपोळी प्रसाद (नैवेद्य)' अर्पण करणे, शास्त्रोक्त आरती करणे आणि भक्ताच्या वतीने कौटुंबिक कल्याण व समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करणे यांचा समावेश आहे.

।। श्री तुळजाभवानी पौर्णिमा विशेष सेवा: 'पंचामृत अभिषेक व नैवेद्य' पूजा ।। हिंदू संस्कृतीनुसार दरमहा येणारी पौर्णिमा ही अत्यंत पवित्र, चैतन्यदायी आणि सकारात्मक ऊर्जेची पर्व मानली जाते. ज्या भाविकांना तुळजापूरच्या पावन शक्तिपीठावर प्रत्यक्ष उपस्थित राहून पूजा करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आम्ही 'पौर्णिमा विशेष पंचामृत अभिषेक व नैवेद्य' सेवा सुरू केली आहे. साळुंके पुजारी यांच्या माध्यमातून महिन्यातील पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या नावे हा शास्त्रोक्त विधी संपन्न केला जातो. यासाठी आपण एक पूजा

।। श्री तुळजाभवानी नवरात्र महापर्व: सर्वसमावेशक विशेष 'नवरात्र महापूजा' सेवा ।। नवरात्रीच्या नऊ रात्री म्हणजे भक्तीचा अथांग महासागर! ज्या भाविकांना वेळेअभावी किंवा अंतरामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांच्या मागणीनुसार आम्ही 'एकत्रित नवरात्र विशेष पूजा' सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये दुग्ध अभिषेक, पुरणपोळी नैवेद्य, नंदादीप तेल सेवा, साडी-खण व नारळ ओटी, कुमारिका पूजन, दुर्गासप्तशती पाठ आणि कुंकुमार्चन या सर्व सेवा तुमच्या नावे शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न केल्या जातात.

।। श्री तुळजाभवानी माता विशेष सेवा: पारंपारिक 'सवाष्ण पूजन आणि भोजन' सेवा ।। सनातन संस्कृतीमध्ये आणि कुलधर्म-कुलाचारात 'सवाष्ण भोजन व पूजन' करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. श्री तुळजाभवानी मातेच्या कृपेसाठी आणि कौटुंबिक समृद्धीसाठी सुवासिनी पूजन केले जाते. ज्या भाविकांना तुळजापूरच्या पावन शक्तिपीठावर प्रत्यक्ष उपस्थित राहून ही सेवा करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आम्ही ही विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे. साळुंके पुजारी यांच्या माध्यमातून तुमच्या नावे हा पवित्र विधी संपन्न केला जातो.

श्री तुळजाभवानी 'अभिषेक पूजा' आणि ६ वार साडी अर्पण सेवा || साळुंके पुजाऱ्यांद्वारे केली जाणारी ही 'अभिषेक पूजा व ६ वार साडी अर्पण सेवा' म्हणजे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा पंचामृताने (दूध, दही, मध, साखर आणि पूजा साहित्य) केला जाणारा विधीवत अभिषेक आणि पारंपरिक ९ वार साडी अर्पण करण्याचा पवित्र विधी होय. यानंतर पारंपरिक पूजा आणि भक्ताच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली जाते.
0 वस्तू