अटी आणि शर्ती (Terms & Conditions)
- वापरकर्त्याची सहमती व अटींची मान्यता: या संकेतस्थळाचा (वेबसाईटचा) वापर करण्यापूर्वी कृपया खालील नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. या संकेतस्थळाचा वापर करणे याचा अर्थ असा आहे की, तुम्ही या अटी बिनशर्त मान्य केल्या आहेत.
- नोंदणी व माहितीची अचूकता: पूजा सेवा बुकिंग करताना भाविकांनी आपले पूर्ण नाव, गोत्र, अचूक पत्ता (पिनकोडसह) आणि संपर्क क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. ही माहिती प्रसादाची पाकिटे अचूक पत्त्यावर पोहोचवण्यासाठी आणि संकल्पासाठी आवश्यक आहे.
- ऑनलाइन / अप्रत्यक्ष पूजा सेवा: वेबसाईटवर “Online Puja” किंवा “भाविकांच्या वतीने पूजा” म्हणून दर्शविलेली सेवा ही भाविकाच्या संकल्पाने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे उपलब्ध धार्मिक पद्धतीनुसार पार पाडली जाते. ही सेवा प्रत्यक्ष दर्शन किंवा गर्भगृह प्रवेशाचा पर्याय नाही.
- दर्शन पास / अभिषेक पास बाबत विशेष स्पष्टीकरण: वेबसाईटवर बुक केलेली सेवा ही केवळ धार्मिक पूजा विधीसाठी आहे. यामध्ये श्री तुळजाभवानीचा अभिषेक पास, सशुल्क दर्शन पास (देणगी पास), धर्मदर्शन, मुखदर्शन पास किंवा गर्भगृह प्रवेशाचा समावेश नाही. दर्शनासाठीचे सर्व पास भाविकांनी अधिकृत प्रशासनाकडून स्वतः प्राप्त करणे बंधनकारक आहे.
- पूजा शुल्क व अधिकृत दक्षिणा: या वेबसाईटवरून स्वीकारली जाणारी रक्कम ही श्री तुळजाभवानी देवीचे हक्कदार पुजारी श्री नागेश कालिदास साळुंके या नात्याने पूजेची 'दक्षिणा', पूजा सामग्री आणि 'सेवा शुल्क' म्हणून स्वीकारली जाते.
- रद्दीकरण व परतावा धोरण: पूजा सेवा अद्याप सुरू झालेली नसल्यास नियोजित पूजेपूर्वी कळवून रद्दीकरणाची विनंती करता येईल. संकल्प व पूजा-विधी पूर्ण झाल्यानंतर परतावा मागता येणार नाही. मंजूर झालेला परतावा ५ ते १० कामकाजाच्या दिवसांत मूळ पेमेंट खात्यात जमा केला जाईल.
- प्रसाद वितरण व्यवस्था: पूजा सेवेतील प्रसाद केवळ भारतीय टपाल विभागामार्फत (India Post) किंवा कुरिअरद्वारे १५ दिवसांच्या कालावधीत पाठवला जाईल. टपाल विभागाच्या विलंबामुळे किंवा अचूक पत्ता नसल्यामुळे प्रसाद न मिळाल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल.
- प्रसाद मर्यादा व अपवाद: कुमारीका भोजन, सुवासिनी भोजन, महानैवेद्य आणि कन्या पूजन यांसारख्या सेवांचा प्रसाद टपालाने पाठवला जात नाही. हे विधी प्रत्यक्ष अर्पण स्वरूपाचे असतात.
- सेवा ठिकाण व अधिकार: वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सर्व पूजा आणि धार्मिक सेवा श्रीक्षेत्र तुळजापूर आणि पावन परिसरात पार पाडल्या जातात. वेबसाईटवरील पूजा साहित्य, वेळ, फोटो आणि अटी यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव आहेत.
- संकेतस्थळ व्यवस्थापन व मालकी: https://tuljapurpujari.com/ या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल श्री तुळजाभवानी मातेचे वंशपरंपरागत हक्कदार पुजारी श्री नागेश कालिदास साळुंके (मो. 9923050807 / 9763636868, ई-मेल: tuljabhavanipuja@gmail.com) यांच्या सूचनेनुसार केली जाते.
- पेमेंट गेटवे व सुरक्षितता: ऑनलाइन पेमेंटसाठी सुरक्षित पेमेंट गेटवेचा (Razorpay) वापर केला जातो. वापरकर्त्यांनी आपला OTP, UPI PIN किंवा Password कोणाशीही शेअर करू नये. रकमेच्या कपातीबाबत काही समस्या असल्यास संपर्क साधावा.
- कॉपीराइट धोरण: या वेबसाईटवरील मजकूर, छायाचित्रे, व्हिडिओ, डिझाइन आणि सामग्रीचे हक्क सुरक्षित आहेत. पूर्वपरवानगीशिवाय व्यावसायिक वापर किंवा पुनर्मुद्रण अनुमत नाही.
- धार्मिक माहिती व उत्तरदायित्व मर्यादा: वेबसाईटवरील माहिती उपलब्ध धार्मिक ग्रंथ, परंपरा आणि स्थानिक पद्धतींवर आधारित आहे. विविध परंपरांनुसार विधींमध्ये फरक असू शकतो, त्यामुळे ही माहिती कोणत्याही कायदेशीर कारणांसाठी पुरावा मानला जाणार नाही.
- स्वेच्छेने वापर: तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पूजा सेवा बुकिंग करताना ऑनलाईन स्वरूपात पेमेंट करता. तुम्ही आमच्या वेबसाईटवर पूजा किंवा इतर सेवा करण्यासाठी बंधनकारक नाही.
- बाह्य वेबसाइट्स Links (External Links): सोयीसाठी दिलेल्या बाह्य वेबसाइट्सच्या (Google, India Post, Official Portals) माहिती व सुरक्षेसाठी संबंधित बाह्य वेबसाइट मालक जबाबदार असतील.
- तक्रार निवारण व संपर्क: वेबसाईटवर बुक केलेल्या पूजा/प्रसाद, अधिक माहिती, समस्या किंवा तक्रारींसाठी कृपया ९९२३०५०८०७ / ९७६३६३६८६८ वर किंवा tuljabhavanipuja@gmail.com वर Booking ID सह संपर्क साधावा.
गोपनीयता धोरण (Privacy Policy)
तुळजापूर पुजारी (https://tuljapurpujari.com/) वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा आदर करते. पूजा सेवा, संकल्प, प्रसाद वितरण, पेमेंट पडताळणी आणि ग्राहक सेवेसाठी भाविकांचे पूर्ण नाव, गोत्र, मोबाईल नंबर, ई-मेल आणि अचूक पत्ता (पिनकोडसह) संकलित केला जातो. ही माहिती केवळ पूजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रसाद पाठवण्यासाठी वापरली जाते. वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती कोणत्याही त्रयस्थ पक्षाला विकली जात नाही; केवळ पेमेंट (Razorpay), कुरिअर (India Post) आणि एसएमएस सेवा प्रदात्यांसोबत आवश्यक तेवढीच सामायिक केली जाते. पोर्टल सुरक्षेच्या दृष्टीने तांत्रिक माहितीची (IP, ब्राउझर) नोंद घेते. वैयक्तिक माहितीची पूर्ण गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाते.
उत्तरदायित्व नाकारणे (Disclaimer)
या वेबसाईटवर आम्ही श्री तुळजाभवानी माता, पूजा विधी, धार्मिक परंपरा, पर्यटन व सेवांविषयी माहिती पुरवत आहोत. ही माहिती उपलब्ध ग्रंथ, पारंपरिक पद्धती आणि स्रोतांच्या आधारे परिश्रमपूर्वक उपलब्ध केली असली, तरी विविध कुटुंबपरंपरेनुसार विधींमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे वेबसाईटवरील माहिती हा कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा मानला जाणार नाही. ही सेवा प्रत्यक्ष दर्शन किंवा गर्भगृह प्रवेशाचा पास नाही. प्रवासाचा किंवा दर्शनाचा निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत स्रोताशी पडताळणी करावी. कोणत्याही संभ्रमासाठी tuljabhavanipuja@gmail.com किंवा ९९२३०५०८०७ वर संपर्क साधावा.
परतावा धोरण (Cancellation & Refund Policy)
ज्या भक्तांनी आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून पूजा विधी बुकिंग केली आहे, त्यांनी पूजा विधी सुरू होण्यापूर्वी कळवल्यास त्यांची पूजा रद्द करून परतावा मंजूर केला जाईल. पूजा, संकल्प किंवा नैवेद्य पूर्ण झाल्यानंतर परतावा अनुमत नाही. दुहेरी पेमेंट किंवा तांत्रिक त्रुटी झाल्यास पडताळणी करून रक्कम ५ ते १० कामकाजाच्या दिवसांत मूळ पेमेंट पद्धतीवर (बँक/UPI/कार्ड) परत केली जाईल. जर प्रसादाचे पार्सल प्राप्त झाले नाही, तर Booking ID सह WhatsApp नंबर 9763636868 / 9923050807 वर कळवावे, पडताळणी करून प्रसाद पुन्हा पाठवण्यात येईल.
हायपरलिंकिंग धोरणे (Hyperlinking Policy)
साइटवर भाविकांच्या सोयीसाठी अधिकृत प्रशासन, शासकीय विभाग, पेमेंट गेटवे किंवा वाहतूक सेवांच्या बाह्य वेबसाइट्सच्या Links (जोडण्या) दिल्या आहेत. बाह्य जोडणी निवडल्यास तुम्ही https://tuljapurpujari.com/ मधून बाहेर पडता आणि त्या बाह्य वेबसाइटचे सुरक्षा धोरण लागू होते. बाह्य संकेतस्थळांवरील मजकूर, माहितीची अचूकता किंवा सुरक्षेसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
कॉपीराइट धोरणे (Copyright Policy)
या संकेतस्थळावरील मजकूर, लेख, छायाचित्रे, व्हिडिओ, डिझाइन, लोगो आणि डिजिटल साहित्य यांचे कॉपीराइट हक्क सुरक्षित आहेत. पूर्वपरवानगीशिवाय व्यावसायिक वापर, पुनर्प्रकाशन, विक्री किंवा संपादन अनुमत नाही. केवळ धार्मिक व शैक्षणिक संदर्भासाठी पूर्वपरवानगीने आणि मूळ स्रोताचा स्पष्ट उल्लेख करून वापर करता येईल. परवानगीसाठी tuljabhavanipuja@gmail.com वर संपर्क साधावा.
अभिप्राय, सूचना व तक्रार निवारण (Feedback & Grievance Redressal)
भक्तांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ धार्मिक सेवा पुरवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीबद्दल भक्तांनी आपल्या मौल्यवान सूचना, अभिप्राय किंवा तक्रारी ९९२३०५०८०७ / ९७६३६३६८६८ किंवा tuljabhavanipuja@gmail.com वर Booking ID / Transaction ID सह पाठवाव्यात. प्राप्त अभिप्राय व सूचनांनुसार माहितीमध्ये वेळोवेळी आवश्यक सुधारणा करण्यात येईल.