Loading Seva

नवरात्र काळात तुळजापूरला येणाऱ्या लाखो भाविकांना उत्सवाची संपूर्ण आणि अचूक माहिती देणे हा मुख्य उद्देश आहे.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरन्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते॥
।। जय भवानी ।।
श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवात आपले मनःपूर्वक स्वागत !
|| श्री क्षेत्र तुळजापूर शारदीय नवरात्र उत्सव || कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची माहिती, उत्सव वेळापत्रक व भाविकांसाठी विशेष सेवा श्री क्षेत्र तुळजापूर येथील शारदीय नवरात्र उत्सव हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील कोट्यवधी भक्तांसाठी एक अनमोल, अलौकिक आणि आत्मानंदाचा सोहळा असतो. या पावन पर्वकाळात आई भवानीच्या दर्शनासाठी आणि अनुष्ठानासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला महोत्सवाची अचूक व अधिकृत माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी श्री तुळजाभवानी देवीचे वंशपरंपरागत अधिकृत पुजारी - श्री नागेश साळुंके यांच्या वतीने हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. शारदीय नवरात्रोत्सवाचे धार्मिक महत्त्व तुळजापूर हे एक पूर्ण शक्तिपीठ मानले जाते. येथील नवरात्रौत्सव हा देवीच्या 'निद्रा', 'जागरण' आणि 'विजय' या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचा अलौकिक संगम असतो. या ९ दिवसांत श्री तुळजाभवानी देवीची उपासना, अभिषेक, आणि साडी अर्पण सेवा केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
पेजचा उद्देश: तुळजापूर मध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना यात्रा काळात उपलब्ध असलेल्या तुळजापूर मधील सोयी-सुविधांची माहिती देऊन त्यांचा प्रवास सुकर करणे.
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत आहे. आई भवानीच्या चरणी लीन होण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा प्रवास आरामदायी आणि सुलभ व्हावा, यासाठी आम्ही विविध सेवा आणि सुविधा बाबतची माहिती उपलब्ध करून दिल्या आहेत.

9 Min (610m)

14 Min (610m)


।। ॐ श्री भवानी देव्यै नमः ।। श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन आणि विविध पूजा सेवेसाठी आपली तुळजापूरची ही यात्रा अत्यंत सुखद, मंगलमय आणि आदरयुक्त जावो, अशी आदिशक्ती कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी चरणी आम्ही कोटी कोटी प्रार्थना करतो!