श्री तुळजाभवानी माता
श्री क्षेत्र तुळजापूर
श्रद्धा • शक्ती • परंपरा • अध्यात्म
श्री तुळजाभवानी माता हे.साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रथम पीठ: श्री क्षेत्र तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा जगदंबेचे साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रथम पूर्ण पीठ मानले जाते. आई तुळजाभवानी ही चैतन्य, शक्ती आणि सृजनाची अधिष्ठात्री देवता आहे. इतिहास व आख्यायिका: महर्षी मार्कंडेय पुराणाट व अन्य ग्रंथांनुसार, देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी या भूमीवर अवतार घेतला. चंचल आणि भक्तवत्सल अशी ही आई आपल्या लेकरांच्या हाकेला धावून येते, अशी अगाध श्रद्धा आहे
देवीला भक्त विविध नावांनी संबोधतात—तुळजाभवानी, भवानी माता, अंबाबाई, जगदंबा, तुकाई इत्यादी.
धार्मिक श्रद्धेनुसार देवी ही शक्ती, संरक्षण, धैर्य, न्याय आणि मातृत्वाचे प्रतीक मानली जाते.
(देवी कोणत्या स्वरूपाची आहे?”, “कुलस्वामिनी म्हणून महत्त्व”, “भक्तांच्या श्रद्धा” आणि “पौराणिक संदर्भ”)
श्री तुळजाभवानी मंदिराचा इतिहास
तुळजाभवानी मंदिराची परंपरा अनेक शतकांपासून तुळजापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार मंदिराच्या इतिहासाचा संबंध मध्ययुगीन काळाशी जोडला जातो आणि मंदिराच्या स्थापत्य व विस्तारामध्ये विविध काळातील योगदान दिसून येते.
प्राचीन धार्मिक परंपरा
मध्ययुगीन तुळजापूर व मंदिराचा विकास
राजघराणी व भक्तपरंपरेचे योगदान
छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेची श्रद्धा
आधुनिक काळातील मंदिर व्यवस्था
आश्री तुळजाभवानी मंदिर
धार्मिक परंपरेनुसार: आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेशी निघडीत अनेक कथा वरील प्रमाणे सांगितली जाते.
ऐतिहासिक संदर्भानुसार: उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांमध्ये ववरील विषयवार माहिती आढळते. परकीय आक्रमण मुळे धार्मिक आणि इतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न झाले परंतु बरीच माहिती धार्मिक ग्रंथ ,पोथी,इतर दस्त मध्ये आढळते
श्री तुळजाभवानी मातेचे आध्यात्मिक महत्त्व
भक्तांच्या श्रद्धेनुसार श्री तुळजाभवानी माता ही शक्ती, संरक्षण, धैर्य आणि मातृत्वाचे प्रतीक आहे.
देवीच्या उपासनेत भक्ती, श्रद्धा, संकल्प, सेवा, नामस्मरण आणि धार्मिक आचरण यांना महत्त्व दिले जाते.
श्री तुळजाभवानी मातेच्या पूजा व धार्मिक परंपरा
मंदिरातील धार्मिक विधी आणि दैनंदिन कार्यक्रम हे मंदिराच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग आहेत.आज रोजीही शेकडो वर्षे पासून पालन केले जातात. मंदिर उघडणे आणि बंद बाबत यात्रा कालावधी आणि सुट्टी कालावधी,इत्यादी नुसार मंदिर वेळ देवस्थान निश्चित यांच्या द्वारे केली जाते .
मुख सण व उत्सव वार्षिक उत्सव,शारदीय नवरात्र/ अश्विन पौर्णिमा / कोजागिरी,शाकंभरी नवरात्र,चैत्र पौर्णिमा ,गुढीपाडवा,विजयादशमी / दसरा
इतर वर्षभर होणारे सण उत्सव ,धार्मिक उत्सव इत्याद साजरे होतात
शारदीय नवरात्र महोत्सव: आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चालणारा हा सोहळा अत्यंत भव्य असतो. यात घटस्थापना, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी, महानवमी आणि विजयादशमीला (सिमोल्लंघन) विशेष मान असतो.
नवरात्र व इतर उत्सव: नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, तसेच हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात होणारे विविध पालखी उत्सव आणि छबिना सोहळे मंदिराचे वैभवात भर घालतात.
मंचकी निद्रा: नवरात्रीच्या आगमनापूर्वी देवी काही दिवस 'मंचकी निद्रेत' जाते, जो येथील परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो.
श्री तुळजाभवानी मंदिर शी निगडित अनेक लोकश्रद्धा / आख्यायिका/परंपरा /रुडी आहेत .